गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल देणार ‘टेस्टट्यूब बेबी’ साठी मोफत उपचार


गेल्या काही वर्षांत तरुण जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक पद्धतीने त्यांना बाळ होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. यावरील उपचाराकरिता त्यांना अनेक वेळा आयव्हीएफ उपचार पद्धतीने टेस्टट्यूब बेबीसाठी प्रयत्न केले जातात. या वंध्यत्व निवारणाच्या उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च येतो. गरिबांना मात्र हा खर्च परवडत नसल्यामुळे ते उपचार घेत नाहीत. मात्र, आता शासकीय रुग्णालयात प्रथमच कामा रुग्णालयात गरीब रुग्णांना हे उपचार अगदी मोफत मिळणार आहे. शुक्रवारी या केंद्रास शासनाकडून मान्यता मिळाली. याकरिता साडेचार कोटी खर्च केले जाणार आहेत.